Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Lockdown: घर उद्योगाला घरघर… मुंबई, पुणे, बंगळुरूसहीत ९ मोठ्या शहरांमध्ये गिऱ्हाईकच नाहीत
![Leaving online at the hands of Deputy Chief Minister Ajit Pawar for authority houses in Pimpri](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/home-loan_660_020117053409_030917101300_103018074036.jpg)
करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. आर्थिक व्यवहारांवरदेखील याचा मोठा परिणाम झाला आहे. बांधकाम व्यवसाय क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसताना दिसत आहे. देशातील ९ मोठ्या शहरांमध्ये जानेवारी ते मार्च या कालावधीदरम्यान घरांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं दिसून आलं. यामध्ये मुंबई, पुणे, बंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, गुरुग्राम, हैदराबाद, नॉएडा आणि कोलकाता या शहरांचा समावेश आहे.