Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Lockdown: खासगी विनाअनुदानी शाळांतील विद्यार्थ्यांना फी मध्ये सुट द्या; आशिष शेलारांचं शिक्षमंत्र्यांना पत्र
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/633688-ashish-shelar.jpg)
कोरोना आणि लाँगडाऊनमुळे प्रत्येकाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात शाळांची फी वाढ शासनाने रोखावी. तसंच सीबीएसई, आयसीएसई, आयबी आणि आयजीसीएससी शाळांच्या फी मध्ये कमीतकमी १० टक्क्यांची सुट द्यावी, अशी मागणी भाजपा नेते अॅड. आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना एक पत्र लिहिलं आहे.