#Lockdown: ‘काँग्रेस स्थलांतरित मजुरांचे ट्रेन तिकिटाचे पैसे भरेल’, सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
स्थलांतरित मजुरांकडून ट्रेन तिकिटाचे पैसे घेण्याच्या मुद्दावरुन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. या मजुरांचे ट्रेन तिकिटांचे पैसे काँग्रेस भरेल असे सोनिया गांधी यांनी जाहीर केले आहे. लॉकडाउनमुळे विविध राज्यात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांची घरी परतण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
स्थलांतरित मजुरांसाठी विविध राज्यांमधून ट्रेन सोडण्यात येत आहेत. पण त्यासाठी ट्रेन प्रवासाचे तिकिट शुल्क आकारले जात आहे. त्यावरुन सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘स्थलांतरित मजुरांच्या पाठिशी आम्ही ठामपणे उभे आहोत’ असे सोनिया गांधी यांनी पत्रात म्हटले आहे.
“कामगार आणि मजूर हे आपल्या देशाच्या प्रगतीचे दूत आहेत. जेव्हा आपले सरकार परदेशात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी मोफत हवाई प्रवासाची व्यवस्था करते, गुजरातमधल्या एका कार्यक्रमासाठी वाहतूक आणि भोजनासाठी १०० कोटी रुपये खर्च करते, रेल्वे मंत्रालयाकडून पीएम करोना फंडाला १५१ कोटी रुपयांची देणगी दिली जाते, मग प्रगतीचे दूत असलेल्या स्थलांतरित मजुरांना या कठिण काळात मोफत रेल्वे प्रवास का करु दिला जात नाही” असा सवाल सोनिया गांधी यांनी केला आहे.
कांग्रेस अध्यक्षा, श्रीमती सोनिया गांधी का बयान
— Congress (@INCIndia) May 4, 2020
भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ने यह निर्णय लिया है कि प्रदेश कांग्रेस कमेटी की हर इकाई हर जरूरतमंद श्रमिक व कामगार के घर लौटने की रेल यात्रा का टिकट खर्च वहन करेगी व इस बारे जरूरी कदम उठाएगी। pic.twitter.com/DWo3VZtns0
फक्त चार तासांच्या नोटीसवर लॉकडाउन करण्यात आला. त्यामुळे कामगार, मजुरांना त्यांच्या घरी परतण्याची संधी मिळाली नाही असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.