breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Lockdown: औषधे आणण्याठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू, पोलिसांनी मारहाण केल्याचा कुटुंबाचा आरोप; पोलीस म्हणतात…

आंध्र प्रदेशमधील गुंटूर येथे सोमवारी (२० एप्रिल २०२०) रोजी एका २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या तरुणाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी पोलीस आणि प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. मृत तरुणाचे वडील मोहम्मद अदिम यांनी “लॉकडाउनच्या काळात माझा मुलगा मोहम्मद घौस औषधे आणण्यासाठी गेला होता. चेकपोस्टवर पोलिसांनी त्याला चेकपोस्टवर थांबवले. त्यानंतर पोलिसांनी मागून हल्ला केला. त्यातच तो जागेवर कोसळला,” असा आरोप केला आहे.

हा तरुण चेकपोस्टजवळच कोसळल्याने पोलिसांनी तातडीने त्याला जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या तरुणाला सुरुवातीपासूनच हृदयाशी संबंधित आजार होता. ‘कार्डीओ-व्हॅसक्युलर डिसीज’चा आजार असल्याने या तरुणाचा मृत्यू कार्डीअ‍ॅक अरेस्टमुळे झाला आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

गुंटूरचे पोलीस महानिरिक्षक प्रभाकर राव यांनी सतेनापाली शहराचे निरिक्षक रमेश बाबू यांना सस्पेंड केलं आहे. या प्रकरणात कलम १७४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशीचे आदेशही देण्यात आलेले आहेत.

पोलीस महानिरिक्षकांनी या घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “प्राथमिक तपासानुसार पोलिसांनी या तरुणाला मारहाण केली नाही. या तरुणाला पोलिसांनी केवळ औषधाची चिठ्ठी दाखवण्यास सांगितले. पोलीस या तरुणाकडे चौकशी करत असतानाच त्याला चक्कर आली आणि तो जमीनीवर पडला. त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केले मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला,” अशी माहिती पोलीस महानिरिक्षकांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button