breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Lockdown:अर्थमंत्री सीतारमन यांची पत्रकार परिषद, लॉकडाऊन 4 च्या नियमांकडेही लक्ष

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजपासून ही पाचवी पत्रकार परिषद आहे.

देशव्यापी लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याचा कालावधी आज (17 मे) संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौथ्या टप्प्याची घोषणा आधीच केलेली आहे. मात्र त्याचे नियम आणि अटी काय असतील, कोणत्या भागांना शिथिलता मिळणार, कुठे निर्बंध अधिक कठोर होणार, याविषयी आज घोषणा होण्याची शक्यता आहे.

निर्मला सीतारमन यांनी काल कोळसा, खनिजक्षेत्र, संरक्षण उत्पादने, विमानतळे, हवाईहद्द व्यवस्थापन, दुरुस्ती, अवकाश, ऊर्जा पारेषण कंपन्या आणि अणुऊर्जा या आठ क्षेत्रांबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. संरक्षण क्षेत्रातील परदेशी गुंतवणुकीचे प्रमाण 49 टक्क्यांवरुन 74 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे. देशात तयार होणाऱ्या शस्त्रांचे उत्पादन वाढवण्यात येणार आहे. तसेच काही संरक्षण साहित्याची आयात रोखणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button