ताज्या घडामोडीदेश-विदेश

करवीरचे आमदार पी.एन पाटील यांचे निधन

सात दिवसात लाडक्या ब्रुनोने घेतला जगाचा निरोप

कोल्हापूर : काँग्रेसचे निष्ठावंत आमदार अशी ओळख असलेले कोल्हापुरातील करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी एन पाटील यांचं गेल्या बुधवारी पहाटे निधन झाले. यामुळे अवघा जिल्हा शोकसागरात बुडाला होता, अनेक दिग्गज नेत्यांनी आमदार पी एन पाटील यांना श्रद्धांजली वाहिली होती. आता त्यांच्या मृत्यूला सात दिवस उलटत नाहीत तोपर्यंत आमदार पाटील यांचा लाडका ब्रुनो या श्वावानानेही जगाचा निरोप घेतला. गेल्या नऊ वर्षांपासून घरात सदस्य बनलेला श्वान लाडक्या पालकाचा विरह सहन करू शकला नाही, मुक्या प्राण्याला जीव लावल्यास प्राणीही माणसापेक्षा अधिक भावनिक असतात हेच यामुळे सिद्ध झाले आहे.

दिवंगत आमदार पी एन पाटील हे रविवारी 12 मे रोजी घरात बाथरूम मध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या मेंदूला जबर इजा झाली होती. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना गेल्या बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली यानंतर राज्यभर आमदार पाटील यांच्या निधनाने हळहळ व्यक्त झाली. करवीर तालुक्यातील आमदार पाटील यांचे जन्मगाव असलेल्या सडोली खालसा या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिवंगत आमदार पाटील यांच्या राजारामपुरी येथील निवासस्थानी गेली नऊ वर्ष त्यांच्यासोबत असलेला त्यांचा स्वान ब्रूनो हा घरातील सर्व सदस्यांचा लाडका होता. मात्र आमदार पाटील हे दवाखान्यात दाखल झाल्यापासून या मुक्या प्राण्यांने अन्नपाणी सोडले होते. तर काही दिवसांनी पी एन पाटील यांचं निधन झाल्यापासून ब्रुनो नेहमी नाराज आणि एका ठिकाणी बसून राहायचा घरातील सर्वांनी त्याला खाऊ घालण्याचा प्रयत्न केला तरी देखील तो जेवत नव्हता. पी एन पाटील यांच्या आठवणीत आज या मुक्या प्राण्यांने ही जीव सोडला, गेली नऊ वर्ष आपल्या मालकाची इमाने इतवारी प्रामाणिक राहिलेल्या या श्वानाच्या एक्झिट नंतर मालकावरील या मुक्या प्राण्याचे प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
निरोपाला पंचक्रोशीतले हजारो गावकरी, नेते आणि कार्यकर्ते जमले.

दिवंगत आमदार पी. एन. पाटील निवासस्थानी असताना कायम पायात घुटमळणाऱ्या लाडक्या ब्रुनो श्वानानही जगाचा निरोप घेतल्यानंतर आमदार पाटील यांच्या निवासस्थानी सांत्वनासाठी येणारे राजकीय नेते यांच्यासह कार्यकर्ते यांनीही हळहळ व्यक्त केली. आमदार पाटील यांची निष्ठावंत नेता अशी राज्यातील ओळख शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहिली, आमदार पाटील हे पर्यावरण प्रेमी तर होतेच मात्र ते श्वान प्रेमी देखील होते त्यांचा कायमचा सोबती असलेला ब्रुनो श्वानही आता अवघ्या आठ दिवसात सोडून गेल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button