breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

रिलायन्स कडून जिओ फोनकॉल एआय फीचर लॉन्च, जाणून घ्या कोणत्या गोष्टी होणार सोप्या?

Jio Phone Call AI | रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी जिओ फोन कॉल एआय फीचरचे अनावरण केले आहे, ज्यामुळे अनेक गोष्टी सोप्या होणार आहेत. जिओ फोनकॉल एआय फीचरच्या मदतीने कॉल रेकॉर्डिंग, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सक्राइब म्हणजेच कॉल्सचे टेक्स्टमध्येही रुपांतर करता येणार आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४७ वार्षिक सर्वसाधारण सभेत या नव्या फीचरची घोषणा करताना रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे चेअरमन आकाश अंबानी म्हणाले की, जिओ फोनकॉल एआय फीचर वापरणे खूप सोपे असेल. जिओ एक नंबर जारी करेल तो आपल्या फोनमध्ये सेव्ह करावा लागेल. त्यानंतर तुम्ही कोणताही कॉल रेकॉर्ड आणि सेव्ह करू शकता आणि ते ट्रान्सक्रिप्ट करू शकता म्हणजेच व्हॉईसचे रूपांतर मजकुरात करू शकता. हे फीचर्स पर्सनल आणि ग्रुप कॉल दोन्हीकडे काम करेल.

हेही वाचा   –    ‘इंदिरा गांधींचं देशासाठीचं योगदान मी नाकारू शकत नाही’; कंगना रणौत

जिओ फोनकॉल एआय फीचर वापरणे खूप सोपे असेल. जिओ एक नंबर जारी करेल, तो आपल्या फोनमध्ये सेव्ह करावा लागेल. कॉल येताच जिओ फोनकॉल एआय वापरकर्त्याला एक मॅसेज येईल. कॉल रेकॉर्ड करण्यासाठी वापरकर्त्याला ‘१’ या क्रमांकावर क्लिक करावे लागेल. वापरकर्त्याला कॉल रेकॉर्ड करायचा नसेल तर त्यांनी ‘२’ या क्रमांकावर क्लिक करावे. ‘३’ या क्रमांकावर क्लिक केल्यानंतर कॉल रेकॉर्डिंग बंद होईल. रिलायन्स जिओने जिओच्या वेलकम ऑफर अंतर्गत आपल्या युजर्सला १०० जीबी फ्री क्लाऊड स्टोरेज प्रायव्हसी आणि सिक्युरिटी फीचर्स देण्याची घोषणा केली आहे. जिओ क्लाउडमध्ये युजर्स फोटो, व्हिडिओ आणि डॉक्युमेंट्स स्टोअर करू शकतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button