सावंतांना मळमळ होत असेल तर म्हशीचे इंजेक्शन, डॉक्टर पाठवू का? अजित पवार गटाच्या महिला नेत्याचा टोला

मुंबई | मंत्रिमंडळ बैठकीत नाईलाजाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या बाजूला बसावे लागते. पण बाहेर आल्यानंतर मला उलट्या होतात, असे विधान राज्याचे आरोग्य मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनी केले. त्यानंतर महायुतीमध्ये उघड वाद पेटला आहे. अजित पवार गटाकडून आता तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. जोपर्यंत राजीनामा घेणार नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळ बैठकीला राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी जाऊ नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केले आहे. यावरून आता अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी खोचक टोला लगावला आहे.
रूपाली ठोंबरे पाटील म्हणाले, खेकड्यामुळे धरण फुटले आणि हाफकिन हा माणूस असल्याचे म्हणणाऱ्या तानाजी सावंत यांच्या बुद्धीची कीव येते. तानाजी सावंत सारखी व्यक्ती राजकारणात राहायला लायक नाही. तुम्हाला एवढी मळमळ, उलटी होत असेल तर म्हशीला मोठं इंजेक्शन देतात, त्या डॉक्टरला पाठवू का? असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी लगावला.
हेही वाचा – रिलायन्स कडून जिओ फोनकॉल एआय फीचर लॉन्च, जाणून घ्या कोणत्या गोष्टी होणार सोप्या?
साखर कारखान्याला भरघोस निधी घेताना कुठे गेली होती मळमळ. एवढेही बेताल बोलू नका की महाराष्ट्राच्या जनतेला तुमची लाज वाटेल. तर बोलताना विचारपूर्वक बोला याचा शेवट राष्ट्रवादी करणार, असंही रूपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या.





