ताज्या घडामोडीराष्ट्रिय

जगदंबा देवीला दोन किलो वजनाचा सोन्याचा मुकुट

कर्जत तालुक्यातील राशीन येथील श्री जगदंबा देवी मंदिरामध्ये शतचिंडी महोत्सव

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील तेराशे वर्ष पुरातन असणाऱ्या श्री जगदंबा देवी मंदिरामध्ये दोन किलो वजनाचा सोन्याचा मुकुट बसवण्यात आला. देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये प्राचीन देवीचे मंदिर अशी ओळख असणारे कर्जत तालुक्यातील राशीन येथील श्री जगदंबा देवी मंदिरामध्ये शतचिंडी महोत्सव सुरू आहे. यानिमित्ताने मंदिरामध्ये सोन्याचा कळस तसेच देवीला दोन किलो सोन्याच्या वजनाचा देवीचा मुखवटा जगदंबा देवी सेवा संस्थांच्या वतीने प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राशीन शहरांमधून या सोन्याच्या मुखटाची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

या मुखवट्याची सेवा संस्थांचे अध्यक्ष विजयराव देशमुख यांच्या हस्ते हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये विधीवत पूजा करण्यात आली. याशिवाय मंदिरामध्ये शतचिंतडी यज्ञ सोहळा व सहस्त्र प्राकृतिक सप्तशती पाठ सोहळा याचे देखील आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने राज्यभरातून भाविक उपस्थित होते.

हेही वाचा  :  ‘२०४७ पर्यंत काँग्रेस हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही’; भाजप नेत्याचं विधान 

यावेळी बोलताना जगदंबा सेवा संस्थांचे अध्यक्ष विजयराव देशमुख म्हणाले की, शीन येथील जगदंबा देवीचे मंदिर राज्यामध्ये प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. या मंदिराला मोठा इतिहास आहे. देशातील व राज्यातील अतिशय पुरातन व देखणे असे हे मंदिर आहे. स्वर्गीय बापूसाहेब देशमुख यांच्या पुढाकारातून सेवा संस्थेची स्थापना झाली. आणि यामुळेच आज या मंदिरामध्ये सोन्याचा कळस तसेच दोन किलो वजनाचा देवीचा सोन्याचा मुकुट याचा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम आज संपन्न झाला. याशिवाय या निमित्ताने शतचंडी यज्ञ सोहळा सप्तशती पाठ यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . या सर्व कार्यक्रमासाठी लाखोच्या संख्येने भाविकांनी येऊन दर्शन घेतले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button