Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

इस्रायल पॅलेस्टाईनविरोधात आक्रमक; पॅलेस्टाईनवर केला रॉकेट्सचा वर्षाव

Israel Under Attack : गेल्या काही दिवसांपासून इस्रायलच्या भूमीवर हमासच्या दहशतवाद्यांकडून कारवाया केल्या जात असल्याचे दावे केले जात होते. हे दहशतवादी मोठ्या कारवाईच्या तयारीत असल्याचंही बोललं जात होतं. शनिवारी सकाळी इस्रायलच्या भूमीवर गाझा पट्ट्यातून किमान डझनभर रॉकेट लाँच करण्यात आले. त्यापाठोपाठ मोठ्या प्रमाणावर गाझा पट्टीतून हमासच्या दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्यानंतर इस्रायलनं युद्धाची घोषणा केली.

इस्त्रायल लष्कराकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोठ्या संख्येनं दहशतवादी इस्रायलच्या भूमीत शिरले आहेत. इस्रायलकडूनही या हल्ल्यांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं जात असून गाझा पट्टीत हवाई हल्ले करण्यात येत आहेत.

हेही वाचा – ISRO लवकरच करणार गगनयान मोहिमेची मानवरहित फ्लाईट टेस्ट 

एकीकडे इस्रायलमध्ये नागरिकांनी घरात राहण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आले असताना गाझा पट्टीत नागरिकांना घरांवरून रॉकेट वेगाने जात असल्याचे, परिसरात सतर्कतेच्या रेड सायरनचे आवाज ऐकू येत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button