Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

इराणचा मोठा निर्णय! भारतासह काही देशांसाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली

Strait Of Hormuz | अमेरिका-इस्रायलविरुद्ध सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जवळपास चार आठवड्यांपासून बंद ठेवण्यात आलेली होर्मुझ सामुद्रधुनी इराणने भारतासह काही मित्र राष्ट्रांसाठी पुन्हा खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी गुरुवारी अधिकृत माहिती दिली. होर्मुझ सामुद्रधुनी दीर्घकाळ बंद राहिल्यामुळे भारतासह अनेक देशांमध्ये इंधन, गॅस आणि खतांच्या पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला होता. त्यामुळे या मार्गाचे पुन्हा सुरू होणे भारतासाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

“आम्ही भारत, पाकिस्तान, चीन, इराक, रशियासह मित्रराष्ट्रांसाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली करत आहोत,” असे अराघची यांनी स्पष्ट केले. मुंबईतील इराणच्या वाणिज्य दूतावासानेही त्यांच्या फोटोसह ही माहिती प्रसिद्ध केली आहे.

हेही वाचा      :            पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले जगातील सर्वात लोकप्रिय नेते; पहा सर्व नेत्यांची यादी

दरम्यान, संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी देखील होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची मागणी केली होती. होर्मुझ बंद असल्यामुळे तेल, गॅस वाहतुकीला खीळ बसल्याचे त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते. तसेच, संघर्षावर मार्ग काढून युद्ध तात्काळ समाप्त करण्याची मागणी केली होती.

होर्मुझ सामुद्रधुनी दीर्घकाळ बंद असल्यामुळे तेल, गॅस आणि खतांच्या वाहतुकीला खीळ बसली आहे. याचा गंभीर फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. युद्धामुळे बसणाऱ्या झळा कमी करण्यासाठी संयुक्त राष्ट्राचे प्रयत्न सुरु आहेत. आणि युद्ध समाप्त करणे हाच परिणाम कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, अशी एक्स पोस्ट गुटेरेस यांनी केली होती.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button