Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

भारताचा पाकिस्तानविरोधात कठोर निर्णय: १६ युट्यूब चॅनेलवर बंदी, शोएब अख्तरचाही समावेश

16 Pakistani YouTube | जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सिंधू नदी जल करार रद्द करणे, पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा नाकारणे आणि भारतातील पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश देण्यासह आता भारताने डिजिटल क्षेत्रातही मोठी कारवाई केली आहे. गृह मंत्रालयाच्या शिफारशींनुसार, भारत सरकारने १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेलवर बंदी घातली आहे. यामध्ये प्रमुख पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांसह माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या युट्यूब चॅनेलचाही समावेश आहे.

भारत सरकारच्या मते, या चॅनेल्सद्वारे भारत, भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांविरोधात प्रक्षोभक, सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील आणि खोटी माहिती पसरवली जात होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर या चॅनेल्सवर भारताविरोधी प्रचार आणि दिशाभूल करणारे व्हिडिओ प्रसारित होत असल्याचे आढळले. गृह मंत्रालयाने या चॅनेल्सवर राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणारा मजकूर शेअर केल्याचा आरोप केला आहे. युट्यूबवर ही चॅनेल्स सर्च केल्यास, “राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्थेशी संबंधित केंद्र सरकारच्या आदेशानुसार हे चॅनेल भारतात उपलब्ध नाही,” असा संदेश दिसत आहे.

हेही वाचा   :    पहलगाम हल्ल्यानंतर महाराष्ट्रात हाय अलर्ट, रेल्वे स्थानकांवर तब्बल ‘इतक्या’ हजार कॅमेऱ्यांची देखरेख

बंदी घातलेल्या युट्यूब चॅनेलमध्ये डॉन न्यूज, समा टीव्ही, एआरवाय न्यूज, बोल न्यूज, रफ्तार, जिओ न्यूज आणि सुनो न्यूज यासारख्या प्रमुख पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांचा समावेश आहे. इर्शाद भट्टी, अस्मा शिराजी, उमर चीमा आणि मुनीब फारूख यांसारख्या पत्रकारांनी चालवलेले यूट्यूब चॅनेल देखील भारतीय वापरकर्त्यांसाठी ब्लॉक करण्यात आले आहेत. इतर बंदी घातलेल्या चॅनेलमध्ये द पाकिस्तान रेफरन्स, समा स्पोर्ट्स, उजैर क्रिकेट आणि रझी नामा यांचा समावेश आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button