भारत-पाकिस्तान फाळणी, अत्यंत दुःखद, दुर्दैवी घटना !
भारताचा स्वातंत्र्य दिन आपण जल्लोषात मोठ्या दिमाखात साजरा करतो. पण, त्यावेळी झालेली भारत पाकिस्तानची फाळणी मात्र क्लेषदायक, दुःखद आणि दुर्दैवीच म्हणावी लागेल !
विभाजन विभीषिका दिवस..
दि. १४ ऑगस्ट २०२१ पासून आपण ‘विभाजन विभीषिका’ स्मृती दिवस म्हणजेच ‘भयकारी फाळणी स्मृती दिन’ पाळायला सुरू केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार हा दिवस पाळण्यात येऊ लागला, म्हणजे फाळणी झाल्यापासून बरोब्बर ७४ वर्षानंतर ! याचाच अर्थ असा की भारतीय समाजमानसामध्ये या भयकारी प्रलयंकारी फाळणीच्या आठवणी, वेदना अजूनही जिवंत आहेत.. ठसठसत आहेत !
वेदना अनुभवणारे खूपच कमी..
आता, या वेदना अनुभवलेली किंवा पाहिलेली मंडळी फारच कमी शिल्लक आहेत. अशा भयकारी दिवसाची स्मृती का बरे करायची ? आठवणींचा अंधार का बरे आठवायचा ? एकतर आपल्या पुढील पिढीला देशाचा येणारा स्वातंत्र्य दिवस काय किंमत मोजून मिळाला, हे कळणे अत्यावश्यक आहे. असे करणे का बरे अत्यावश्यक आहे ? तर हे स्वातंत्र्य मिळवताना आपण हजारो वर्षापासून असलेल्या आपल्या भारतभूचा एक भाग गमावला, हे कळले पाहिजे. त्याचवेळी आपल्या लाखो देशबांधवांच्या या फाळणीच्या वेळी झालेल्या कत्तली हेही समजले पाहिजे.
पुन्हा हा काळाकुट्ट इतिहास नको
उद्या परत आपल्या देशावर ही वेळ येऊ नये, यासाठी हा काळाकुट्ट इतिहास नीटसा माहिती नको का ? आपल्या मुलांना, नातवांना, पतवंडाना अशा कत्तलीना तोंड द्यावे लागू नये, म्हणून त्यांना हे कळणे गरजेचे आहे, नाहीतर पुढील पिढीचे आपण अपराधी, गुन्हेगार ठरू हे निश्चित ! याचा सारासार विचार करूनच या लेखासाठी तयारी केली आहे.
फाळणीची वस्तुस्थिती काय ?
ब्रिटीशांचे फोडा,झोडा आणि राज्य करा हे धोरण. धर्म, जात, पंथ, प्रदेश असे अनेक भेद आपल्यामध्ये निर्माण करून भारतीयांना एकमेकात झुंजत ठेवले.फाळणी ही फक्त धर्माच्या आधारावर झाली. मुस्लीम समाजाने स्वातंत्र्यपूर्व काळात झालेल्या निवडणुकीत पाकिस्तानच्या मागणीला एकमुखाने पाठिंबा दिला होता, हे नेहमी ध्यानात ठेवले पाहिजे. दि. १६ ऑगस्ट १९४६ ला ‘डायरेक्ट अॅक्शन’ या मोहम्मद अली जिनांच्या आदेशानुसार देशभर, विशेषतः कलकत्ता आणि नौखालीत एका दिवसात हजारो हिंदूंच्या कत्तली करून दहशत निर्माण केली गेली. खड्ग हातात धरून आणि रक्त सांडून मुस्लिमांनी पाकिस्तान मिळवले, हे महत्त्वाचे !
एक भाग मुस्लिमांचा, दुसरा धर्मनिरपेक्ष !
जेव्हा धर्माच्या आधारावर फाळणी झाली, तेव्हा एक भाग मुस्लिमांना दिला गेला, तर नैसर्गिक न्यायाने उरलेला भाग हिंदूना मिळायला हवा होता. पण, तो सेक्युलर म्हणजेच धर्मनिरपेक्ष झाला. फक्त, हिंदूच सेक्युलर असू शकतात. इतिहास सांगतो मुस्लीम आक्रमणानंतर धर्मभ्रष्ट व्हायच्या भीतीने पारशी भारतात आले आणि दुधातील साखरेप्रमाणे मिसळून गेले. ख्रिश्चन आणि मुस्लीम, आक्रमणाच्या भीतीने आलेले ज्यू भारतीय जीवनाशी एकरूप झाले. त्यापूर्वीच्या इतिहासात शक आले, हूण आले आणि येथील संस्कृतीशी एकरूप झाले. हा इतिहासही ताजा आहे.
भारत हा सर्व समावेशक..
त्यामुळे, एक गोष्ट स्पष्ट दिसते, ती म्हणजे भारत हाच एक असा देश आहे, जो सगळ्यांना सामावून घेऊन शकतो, मुस्लिमांचे ७२ फिरके एकत्र सुखाने फक्त भारतात नांदतात. इतर कोणत्याही मुस्लीम देशात नाही. १९४७ साली स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानमधे २०.५ टक्के हिंदू होते. न्यू यॉर्क टाइम्सच्या आकड्यानुसार १९९८साली पाकिस्तानमध्ये १.६ टक्के हिंदू शिल्लक राहिले. तर भारतात १९४७ साली ९.८ टक्के मुसलमान होते. २०११ च्या जनगणनेनुसार १४.२३ टक्के मुसलमान लोकसंख्या भारतात आहे, आज निश्चितच ती त्याहून जास्त असावी, हे वेगळे सांगायला नको !
हेही वाचा : सामाजिक विषमता दूर करण्याची जबाबदारी युवा पिढीवर; डॉ. वंदना बोकील
फाळणीबाबत विचाराचे मुद्दे..
धर्माच्या आधारावर फाळणी होऊनसुद्धा भारताने मुस्लिमांना सामावून घेतले, याची जाणीव समाज म्हणून मुस्लीम समाजात आहे का ? हिंदू आणि मुसलमान या दोघांनी विचार करावा, की मुसलमान समाजाने भारताचा हजारो वर्षाचा सांस्कृतिक वारसा, इतिहास, वेशभूषा, भाषा, खानपान, या सगळ्यांशी गेल्या ऐंशी वर्षात किती जुळवून घेतले आहे ? आपले पंतप्रधान नेहमी १४० कोटी भारतीयांचा उल्लेख करतात, पण कटाक्षाने मुस्लीम समाजाचा वेगळा उल्लेख कधीही करत नाहीत, तरीही, भारतीय मुस्लिमांना असुरक्षित का वाटते ? ते स्वतःला या १४० कोटींपेक्षा वेगळे समजतात का? जगामधे सर्वात जास्त दोन नंबरची मुस्लीम लोकसंख्या भारतात असताना ते स्वतःला अल्पसंख्यांक का म्हणवतात?
रोहिंग्यांविषयी एवढे प्रेम का?
रोहिंग्या मुस्लिमांसाठी मुंबईत एवढे मुसलमान का एकवटतात?
अतिरेक्यांच्या शवयात्रेला एवढ्या मोठ्या संख्येने हा समाज का उपस्थित राहतो? आजही सर तन से जुदा का होते? त्याचप्रमाणे, हमास आतंकवाद्यांसाठी भारतात आंदोलने का होतात ? हे न सुटणारे आणि मेंदूला झिणझिण्या आणणारे आहेत.
समाधानकारक उत्तरे शोधण्याची वेळ..
या सर्व प्रश्नांची उत्तरे समाज म्हणून एकत्रितपणे आपण शोधली नाहीत, तर परत एकदा नव्या फाळणीला तोंड द्यावे लागेल, असे वाटत नाही काय? परत आपल्या मुलाबाळांच्या, नातवंडांच्या, कत्तलींना तोंड द्यावे लागेल, असे भय वाटत नाही का ? शहामृगाप्रमाणे वाळूत तोंड खुपसून बसून, ‘ ऑल इज वेल’ असे म्हणून खरेच सगळे शुभ आणि मंगल होणार आहे का ? या फाळणीच्या आठवणी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहेत. तो प्रसंग यापुढे कोणावरही येऊ नये, एवढीच मनापासून तीव्र इच्छा आहे आणि ती सर्वच भारतीयांची आहे हे नक्की!




