ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचा १९ वा वर्धापन दिन उत्साहात

प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन, पुरस्कार वितरण व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

आळंदी (ता. हवेली) : एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचा १९ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.३० वाजता प्रार्थनेने झाली. सूत्रसंचालन श्रीमती पल्लवी महागावकर यांनी केले.

या प्रसंगी स्वागतप्रास्ताविक डॉ. अमोल माने (डीन – स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट) यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. मंगेश भोपळे (डीन – ट्रेनिंग अँड प्लेसमेंट) यांनी करून दिली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तसेच पाच, दहा आणि पंधरा वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

पुरस्कारप्राप्त कर्मचारी व प्राध्यापकांमध्ये श्रीमती आकांक्षा लांडगे, डॉ. वैशाली खेरडेकर, डॉ. शीतल घोटेकर, श्रीमती अनुपमा अलागन्नवार, डॉ. पद्मावती उंडाले, डॉ. अर्चना आहेर आणि श्रीमती सुमित्रा वीर यांचा समावेश होता. विजेत्यांनी आपल्या भावना व्यक्त करत महाविद्यालयाशी असलेल्या ऋणानुबंधांबाबत गौरवोद्गार काढले.

या कार्यक्रमात डॉ. बी. बी. वाफरे (संचालक) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच प्रा. अनंत चक्रदेव (ग्रुप प्रो-व्होस्ट, एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स) यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचालीवर प्रकाश टाकला. प्रमुख पाहुणे डॉ. पराग काळकर (प्रो-व्हाईस चान्सलर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांनी अध्यापन, संशोधन व समाजाप्रती शिक्षकांची भूमिका या विषयांवर मोलाचे विचार मांडले.

‘शिवतांडव’ गीताने कार्यक्रमात रंगत…

प्रा. अक्षदा कुलकर्णी (उपसंचालक – अकॅडमिक्स अँड रिसर्च) यांनी आभारप्रदर्शन करत कार्यक्रमाचा समारोप केला. त्यानंतर पसायदान म्हटले गेले. दुपारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रा. अर्चना आहेर यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. नवीन रुजू झालेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांची ओळख करून देण्यात आली. ‘शिवतांडव’ गीताने सांस्कृतिक सत्राची सुरुवात झाली. नृत्य, नाटिका आणि गायनाच्या बहारदार सादरीकरणाने वातावरण उत्साही झाले. विविध विभागातील प्राध्यापकांनीही आपली कला सादर करत कार्यक्रमात रंग भरले.या आठवणींनी समृद्ध अशा वर्धापन दिनाचा समारोप सायंकाळी ४.३० वाजता झाला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button