थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनला फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर या ठिकाणांना भेट द्या..
![If you are planning to go out for thirty first celebration visit these places..](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Tourist-Destination-780x470.jpg)
Tourist Destination : सध्या थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन आणि नवीन वर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. अनेक जण थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी फिरायला जाण्याचा प्लॅन बनवत आहेत. तुम्हीही फिरायला जाण्याचा प्लॅन बनवत असाल तर, तुम्ही या ठिकानांना भेट देऊ शकतात.
पुद्दुचेरी : थर्टी फर्स्टला फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर पुद्दुचेरी हे ठिकाण बेस्ट आहे . फ्रेंच क्वार्टर, समुद्र किनारे, आरामदायक कॅफे आणि मंदिरं हे पुद्दुचेरीमधील आकर्षण आहे. पुद्दुचेरी हे फ्रेंच आणि भारतीय संस्कृतीचा एकत्र अनुभव घेण्यासाठीच उत्तम ठिकाण आहे.
हेही वाचा – राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा, मुंबईत होणार समारोप
कन्याकुमारी : तुम्हाला स्वस्तात प्रवास करायचा असेल तर कन्याकुमारी हे भारतातील सर्वोत्तम बजेट फ्रेंडली ठिकाणांपैकी एक आहे. येथील समुद्र किनारे, उत्कृष्ट वास्तुकला आणि मंदिरे फार सुंदर आहे. तुम्ही कुठेही ट्रिपचं नियोजन करत असाल तर कन्याकुमारीला तुमच्या यादीत नक्की समावेश करा.
लक्षद्वीप : लक्षद्वीप हे भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. येथील समुद्रकिनारे भारतातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर आहेत. तुम्हाला गोव्यासारखा अनुभव घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी लक्षद्वीप डेस्टिनेशनपेक्षा चांगलं डेस्टिनेशन असूच शकत नाही.