पवारांच्या घरावरील हल्ला भाजपचं षडयंत्र असेल, तर मी खासदारपदाचा राजीनामा देईन : रणजितसिंह नाईक निंबाळकर
![If attack on Pawar's house is a conspiracy of BJP, then I will resign as MP: Ranjit Singh Naik Nimbalkar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/शरद-पवारांच्या-घरावरील-हल्ला-भाजपचं-षडयंत्र-असेल-तर-मी-खासदार.jpg)
सातारा : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहेत. अशात हा हल्ला भाजपने घडवून आणला असा आरोप महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात येत आहे. तर यावर आता माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मोठं विधान केलं आहे.
आज माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्या हल्याचा निषेध व्यक्त करत सुप्रिया सुळे हल्लेखोरांच्या पुढे नसत्या आल्या तर नक्कीच दुर्घटना घडली असती असे सांगून या हल्याचा निषेध व्यक्त केला. पवार साहेबांच्या आम्ही राजकीय विरोधात असलो तरी पवारसाहेब हे महाराष्ट्राचं एक मोठ नेतृत्व आहे आणि त्यांचा आदर महाराष्ट्राचे नेते म्हणून नक्की आम्हाला आहे. पवार साहेबांच्या घरावरील हल्ला हा जर भाजपने घडवून आणला असेल तर मी माझ्या खासदाकीचा राजीनामा देईन असं निंबाळकर यांनी म्हटलं आहे.
इतकंच नाहीतर मला माझ्यापेक्षा जास्त देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या संस्कृतीवर विश्वास आहे. भाजप असं कृत्य करुच शकत नाही, असं मत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केलं आहे.