केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, ७ जणांचा मृत्यू

केदारनाथ : केदारनाथमध्ये पुन्हा हेलिकॉप्टर अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. उत्तराखंडमधील केदारनाथ धाममध्ये आज सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळले. गौरीकुंड परिसरातील त्रिजुगीनारायण नारायणजवळ हा अपघात झाला.
अपघातग्रस्त हेलिकॉप्टर आर्यन कंपनीचे होते आणि ते केदारनाथ धामहून फाटा येथे जात होते. या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व ७ जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि एनडीआरएफच्या टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत.
हेही वाचा – परिवहन मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय! एसटी महामंडळाचे पाच विभागात होणार विकेंद्रीकरण
या अपघातात येथील पायलट कॅप्टन राजबीर सिंग चौहान, विक्रम रावत, विनोद देवी, त्रिशती सिंग, राजकुमार सुरेश जयस्वाल, श्रद्धा राजकुमार जयस्वाल आणि दोन वर्षांची काशी यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत पीडित जयपूर, उत्तर प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील आहेत.
रविवारी सकाळी उत्तराखंडमधील केदारनाथजवळ आणखी एक हेलिकॉप्टर कोसळण्याची घटना घडली. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह ७ जण होते. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर आर्यन एव्हिएशनचे होते आणि ते गौरीकुंडजवळ अपघातग्रस्त झालं होतं, अशी माहिती उत्तराखंडचे अतिरिक्त महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था डॉ. व्ही. मुरुगेशन यांनी दिली.