Breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

परिवहन मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय! एसटी महामंडळाचे पाच विभागात होणार विकेंद्रीकरण

Pratap Sarnaik : येत्या काही काळात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात मोठे बदल करण्यात येणार आहेत. आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विकेंद्रीकरण होणार असून, कर्नाटक परिवहन मंडळाच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात पाच प्रादेशिक विभागांची निर्मिती करण्यात आली आहे.

परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या आदेशानुसार योग्य व्यवस्थापन आणि निर्णयाच्या विकेंद्रीकरणाच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. नुकतेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे कर्नाटक राज्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी तेथील महामंडळाच्या विकेंद्रीकरणाचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे देखील किमान पाच प्रादेशिक विभागांत विभाजन करावे, अशी संकल्पना मांडली. त्यानुसार आता महामंडळाचे पाच विभागात विकेंद्रीकरण करण्यात येणार आहे.

हेही वाचा –  ‘दोन दिवसांत कामे करा, अन्यथा दहा कोटी दंड भरा’; अजित पवारांनी मेट्रो अधिकाऱ्यांना खडसावले

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नियोजन व पणन खातेअंतर्गत कार्यरत असलेल्या विविध संनियंत्रण समित्यांचे बंद असलेली कार्यालये लवकरच या प्रादेशिक विभागांची स्वतंत्र कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत. त्यानुसार महामंडळाचे उपाध्यक्ष व व्‍यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी अंमलबजावणीचे पत्रक काढले आहेत.

एसटीचे तालुकास्तरावर आगार, जिल्हास्तरावर विभागीय कार्यालय आणि राज्य स्तरावर मध्यवर्ती कार्यालय, अशी त्रिस्तरीय रचना सध्या कार्यरत आहे. आता नव्या रचनेत मुंबई, नाशिक, नागपूर, पुणे आणि अमरावती, असे पाच प्रादेशिक विभाग असणार आहेत. प्रत्येक प्रादेशिक विभागांतर्गत कार्यरत विभाग आणि मुख्यालय, असे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button