breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

चक्क पक्ष्यासारखा हवेत उडणारा ‘हा’ मासा तुम्ही कधी पहिला आहे का?

Flying Fish : निसर्गाची किमया अनेकदा आपल्याला थक्क करून सोडते. मासे म्हटले की ते पाण्यात राहतात हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. माशांच्या काही प्रजाती अशाही आहेत की ज्या पाण्यात पोहताना हवेत उसळी घेतात आणि काही फुटांवरपुन्हा पाण्यात सूर मारतात. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्या व्हिडीओमध्ये एक मासा चक्क समुद्राच्या पाण्यावरून लांबपर्यंत उडताना दिसत आहे.

वास्तविक मासे जरी हवेत उसळी घेत असले तरी त्यांच्या पंखांची रचना अशी नसते की ते पक्ष्यांसारखे हवेत उडू शकतील. पण हा जो व्हिडीओमध्ये दिसत आहे, तो मासा वेगळाच आहे. आपले पंख म्हणजेच पाण्यात पोहण्यासाठी उपयोगी येणारे पर पसरून हा मासा हवेत एखाद्या ग्लायडरसारखा तरंगत लांबपर्यंत जातो.

हेही वाचा – पिंपरी चौकात मराठा क्रांती मोर्चाचे आमरण उपोषण!

हा व्हिडीओ एवढा व्हायरल झाला आहे की तो आत्तापर्यंत जवळपास २८ लाख लोकांना पाहिला आहे. या व्हिडीओला काही हजारहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button