सोशल मीडियासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय! थेट अकाउंट्स होणार डिलीट
![Government's big decision regarding social media, direct accounts will be deleted](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Social-Media-780x470.jpg)
Social Media News : सध्या सोशल मीडियासाठी सरकार नवीन नियम आणत असतात. सोशल मीडियावरुन होणाऱ्या गुन्ह्यांचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे आता Instagram, Facebook वरील काही खात्यांवर थेट कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
तीन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांपासून बंद असलेले किंवा एकही अॅक्टिव्ह नसलेले अकाऊंड थेट डिलीट केले जाणार आहेत. हा प्रस्ताव डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन (डीपीडीपी) कायद्याचा भाग आहे, जो या वर्षी ऑगस्टमध्ये कायद्यात रूपांतरित झाला आहे. हा वापरकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय असून यावर सातत्याने कारवाईचे नियोजन केले जात आहे.
हेही वाचा – ‘प्रभू राम फक्त हिंदूंचे नाही, तर..’; फारूख अब्दुल्ला यांचं विधान चर्चेत
सोशल मीडियावर बनवलेला हा नियम ईकॉमर्स कंपन्या, ऑनलाइन मार्केटप्लेस, गेमिंग कंपन्या आणि सर्व सोशल मीडिया कंपन्यांनाही लागू होऊ शकतो. यामुळे भारतातील युजर्सची संख्याही स्पष्ट होणार आहे.