breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

गुगलचे खास डूडल; नारीशक्तीला अनोखी मानवंदना

नवी दिल्ली – आज ‘जागतिक महिला दिना’निमित्त गुगलने डूडलच्या माध्यमातून आपल्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलने डूडलद्वारे जगातील सर्व नारीशक्तीचा सन्मान केला आहे. गुगलने आज डूडलमध्ये शेअर केलेल्या व्हिडीओत महिलांच्या आतापर्यंतच्या कामाचा आढावा घेतला आहे.

गुगलने महिला दिनानिमित्त साकारलेल्या डुडलमध्ये सुरुवातीला काही महिलांचे हात एकमेकींच्या हातात दिसतात. त्यानंतर जगभरातील अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे हात दाखविण्यात आले आहेत. या डूडलमध्ये महिलांच्या हातांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यात महिलांचे पहिले मतदान, विज्ञान क्षेत्रातील काम, लेखिका, प्रवक्त्या, निवेदिका, वकील, खेळाडू अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला दिसत आहे. आज जगात सर्वच क्षेत्रात महिला घराबाहेर पडून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात काम करत आहेत. त्यामुळे जगात महिलांचे उल्लेखनीय स्थान निर्माण झाले आहे. म्हणूनच आज जागतिक महिला दिनी गुगलने डूडलच्या माध्यमातून महिलांना अनोखी मानवंदना दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button