सोने, चांदीचे दर गगनाला भिडले; जाणून घ्या आजचे दर
![Gold, silver prices skyrocketed; Know today's rates](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/Gold-Silver-Price-Today-2-780x470.jpg)
Gold Silver Price Today | सध्या लग्नसराईचा काळ आहे, त्यामुळे आता सोने चांदी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात लगबग सुरु आहे. आता सोने आणि चांदीने पुन्हा दरवाढ केली आहे. गेल्या आठवड्याप्रमाणेच या आठवड्यात मौल्यावान धातूने जोरदार मुसंडी मारली आहे. आज सराफ बाजारात चांदीने इतिहास रचला असून चांदीचा भाव मोठ्या उच्चाकांवर पोहोचला आहे.
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज ७४,०६० रुपये असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७३,१८० रुपये होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ९१,४२० रुपये प्रति किलो आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८७,२५० रुपये प्रतिकिलो होती.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
हेही वाचा – Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे महामार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी मेगा ब्लॉक
सोन्याची शुद्धता कशी तपासावी?
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.
२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.
२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.
२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.
१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.
१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.