गणेशोत्सवापूर्वी आनंदवार्ता! सोने आणि चांदीच्या किंमती झाल्या कमी
Gold Silver Rate | गणेशोत्सवापूर्वी एक आनंदवार्ता आहे. सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. तर आज सोन्याचा व चांदीचा दर काय आहे हे जाणून घेऊयात..
गुडरिटर्न्सनुसार, आज २२ कॅरेट सोने ६६,८३० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७२,९०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर आजच्या बाजारभावाप्रमाणे एक किलो चांदीचा भाव ८५,००० रुपये आहे.
हेही वाचा – कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) २४ कॅरेट सोने ७१,२९५, २३ कॅरेट ७१,०१०, २२ कॅरेट सोने ६५,३०६ रुपयांवर घसरले. १८ कॅरेट आता ५३,४७१ रुपये, १४ कॅरेट सोने ४१,७०८ रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव ८१,३३७ रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.