breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

जॉर्ज फ्लॉईडला न्याय मिळाला खूनी पोलीसाला २२.६ वर्षांची शिक्षा

वॉशिग्टन- संपूर्ण अमेरिकेला हादरवून सोडणाऱ्या कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईड हत्या प्रकरणात अमेरिकेच्या न्यायालयाने मोठा निर्णय जाहीर केला आहे. या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी डेरेक चाऊविन याला दोषी ठरवून २२ वर्ष आणि ६ महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे. वॉशिंग्टनच्या हिनेपीन काउंटी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. या प्रकरणात संबंधित पोलीस अधिकाऱ्याला ३० वर्षांच्या शिक्षेची मागणी झाली होती. परंतु त्याची पूर्वीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्यामुळे त्याला ही शिक्षा ठोठावली असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

२५ मे २०२० रोजी डेरेक चाऊविन या श्वेतवर्णीय ४५ वर्षांच्या पोलीस अधिकाऱ्याने मिनीयापोलिसमधील एका गल्लीत जॉर्ज फ्लॉईटला जमिनीवर पाडून त्याच्या मानेवर गुडघा ठेवला होता. त्यावेळी आपल्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे जॉर्ज या पोलिस अधिकाऱ्याला सांगत होता. परंतु त्यानंतरही जवळपास ९ मिनिटे त्याने त्याची मान गुडघ्याने जमीनीवर दाबून ठेवली होती. त्यामुळे श्वास कोंडून जॉर्जचा मृत्यू झाला होता. या घटनेचे तीव्र पडसाद अमेरिकेत उमटले होते. इतर देशांमध्येही याचे पडसाद उमटले होते. त्यानंतर श्वेतवर्णीय पोलीस अधिकारी डेरेक चाऊविनला बडतर्फ करून अटक केली होती. त्याच्याविरोधात न्यायालयात खटला सुरू होता. त्याचा निकाल लागला आहे. त्यात या प्रकरणात न्यायालयाने माजी पोलिस अधिकाऱ्याला दोषी ठरवून २२ वर्षे आणि ६ महिन्यांची कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ही शिक्षा त्याला कोणत्याही भावनेवर आधारित ठोठावलेली नाही. मात्र जॉर्ज फ्लॉईडच्या कुटुंबीयांना ज्या वेदना झाल्या त्या आपण स्वीकारल्या पाहिजे. त्या लक्षात घेऊन त्याला ही शिक्षा ठोठावली असल्याचे न्यायमूर्ती पीटर ए काहिल यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button