जागतिक बँकेकडून भारताताला ‘नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन’साठी १.५ अब्ज डॉलरचा निधी मंजूर
![Fund of 1.5 billion dollars has been approved by World Bank to India for 'National Green Hydrogen Mission'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/World-Bank-780x470.jpg)
World Bank : भारतातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी जागतिक बँकेकडून १.५ अब्ज अमेरिकन डॉलरचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी भारताने २०२१ मध्ये ‘नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन’ ची घोषणा केली होती. यासाठी जागतिक बँकेकडून भारताला भरघोस निधी देण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती शुक्रवारी वर्ल्ड बँकेने एका प्रकाशनात दिली आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे.
यासंदर्भात जागतिक बँकेने म्हटले आहे की, भारताला कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी चालना देणे, अक्षय ऊर्जा वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे तसेच भारतात ग्रीन हायड्रोजन विकसित करण्यासाठी ही मदत जागतिक बँकेकडून जाहीर करण्यात आली असल्याचे म्हटले आहे. सध्या भारताचा दरडोई ऊर्जेचा वापर जागतिक सरासरीच्या फक्त एक तृतीयांश आहे. २०७० पर्यंत तो निव्वळ शून्य गाठण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे.
हेही वाचा – समृद्धी महामार्गावर अपघातात शिरूरमधील दांपत्यासह २१ वर्षीय मुलीचा मृत्यू
भारताने नूतनीकरणक्षम ऊर्जा निर्मिती आणि खर्चात घट याबाबतीत प्रभावीपणे प्रगती केली आहे. नूतनीकरणक्षम ऊर्जेचे उत्पादन वाढवल्याने कार्बन उत्सर्जन कमी झाले आहे. यामुळे ग्रीन हायड्रोजन क्षेत्राच्या उदयास आणि विस्तारास समर्थन मिळेल, असे देखील मत जागतिक बँकेने एका प्रकाशनात व्यक्त केले आहे. हरित हायड्रोजन विकसित करण्यासाठी भारताला मदत करणार असल्याचा पुनरुच्चार जागतिक बँकेने या प्रकाशनात केला आहे.