१५ मार्चपासून UPI पेमेंट आणखी सोपे होणार
![From March 15, UPI payments will be even easier](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/994953-947635-upi-transactions-india.jpg)
आता डिजिटल पेमेंटसाठी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सेवा ऍक्टिव्ह करणे सोपे होणार आहे. 15 मार्च 2022 पासून बँक खातेदारांना UPI सेवा ऍक्टिव्ह करण्यासाठी डेबिट कार्डऐवजी आधार आणि OTP वापरण्याचा पर्यायदेखील असेल. या व्यवस्थेअंतर्गत बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI)ने हे फीचर पहिल्यांदा सप्टेंबर 2021 मध्ये सादर केले. NPCIने परिपत्रक जारी केले होते आणि बँकांना 15 डिसेंबर 2021 पर्यंत परिपत्रकाच्या सूचनांचे पालन करण्यास सांगितले होते, जे नंतर 15 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आले.
लक्षात घ्या, तुमचे आधार कार्ड तुमच्या कोणत्याही बँक खात्याशी लिंक आहे हे जाणून घेण्यासाठी आता तुम्हाला बँक किंवा आधार कार्ड केंद्रावर जाण्याची गरज नाही. तर घरबसल्या आम्ही सांगतो तसे करा. सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जा. येथे Check Your Aadhaar and Bank Account तपासा या लिंकवर क्लिक करा. येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि सिक्युरिटी कोड टाकावा लागेल. आता तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP येईल. UIDAI वेबसाइटवर हा OTP टाका. येथे तुम्हाला loginचा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा. तुम्ही लॉग इन करताच तुमच्या आधारशी लिंक केलेल्या सर्व बँक खात्यांचे तपशील समोर येतील.