Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडी
राहिले अवघे काही दिवस! FASTag केवायसी ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करा अन्यथा..
![FASTag KYC will be blocked after 31st January](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/FASTag-780x470.jpg)
FASTag | राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वन व्हेईकल वन फास्टॅग उपक्रम सुरू करण्यात आला आहे. NHAI चे उद्दिष्ट एकापेक्षा जास्त वाहनांसाठी समान FASTag वापरणे टाळणे हा आहे.
ज्यांचे KYC पूर्ण नाही ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ३१ जानेवारी नंतर FASTag ब्लॉक केले जाणार आहे. त्यामुळे वाहन चालकांना ३१ जानेवारीपर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
तुमच्या FASTag चे KYC पूर्ण झाले की नाही अशाप्रकारे तपासा :
- सर्वप्रथम https://fastag.ihmcl.com या वेबपोर्टलवर जा.
हेही वाचा – ‘IAS-IPS आणि डॉक्टर झालेल्या मुस्लिम महिलांनी हिजाब घालावा’; मुस्लिम नेत्याचं धक्कादायक विधान
- त्यानंतर तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
- लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्ड मेनूवर जा.
- त्यानंतर डॅशबोर्डच्या उजव्या बाजूला My Profile हा पर्याय निवडा.
- पृष्ठावर My Profile दिसेल ज्यामध्ये तुमची अपडेटेड माहिती असेल.
- तुमचे केवायसी पूर्ण झाले असल्यास तुम्हाला माहिती मिळेल.