Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
Fake & malicious messages: एप्रिलच्या मध्यावर आणीबाणी जाहीर होईल…लष्कर भरती होईल…सोशल मीडियावर बनावट संदेश!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/10-10.jpg)
नवी दिल्ली । महाईन्यूज । टीम ऑनलाईन
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या मध्यावर केंद्र सरकार आणीबाणी घोषित करणार आहे. त्याद्वारे भारतीय लष्कर, नॅशनल कॅडेट कॉर्पोरेशन आणि सिव्हिल अॅडमिनिस्टेशनला मदत करण्यासाठी नॅशनल सर्व्हिसेस स्कीमच्या माध्यमातून नोकरभरती होईल, अशी अफवा सध्या सोशल मीडियावर जोर धरु लागली आहे.
मात्र, अशाप्रकारे कोणतीही अधिकृत माहिती भारतीय लष्काराकडून घोषित करण्यात आलेली नाही. सोशल मीडियावर बनावट आणि दुर्भावनायुक्त संदेश फिरत आहेत. हे पूर्णपणे बनावट आहे, अशी माहिती भारतीय लष्काराच्या सूत्रांनी दिली आहे.