एल्विश यादव पुन्हा अडचणीत, यूट्यूबरला मारहाण; व्हिडीओ व्हायरल..
Elvish Yadav | बिग बॉस ओटीटी फेम एल्विश यादव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. युट्युबर सागर ठाकूर उर्फ मॅक्सटर्नने एल्विशवर त्याच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, एल्विश यादवने त्याला मारहाण केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
यूट्यूबर सागर ठाकूर उर्फ मॅक्सटर्नच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकू शकता की त्याच्यावर ८ ते १० लोकांनी हल्ला केला आहे. मारामारीत त्याच्या ओठाला दुखापत झाली. यासोबतच त्यांनी पुढील व्हिडिओमध्ये याबाबत सविस्तर माहिती देणार असल्याचेही सांगितले आहे.
हेही वाचा – महाराष्ट्राने फक्त राम राम म्हणत घंटा वाजवायची का? उद्धव ठाकरेंचा सवाल
This is an attempt to mūrder. @gurgaonpolice kindly take cognisance!
— Divya Gandotra Tandon (@divya_gandotra) March 8, 2024
यूट्यूबर सागर ठाकूर उर्फ मॅक्सटर्न व्हिडिओमध्ये म्हणाला की, त्याने (एल्विश) मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मी एकटा होतो. एल्विश खूप लोकांना सोबत आणले होते. त्यामुळे मी त्याचा पूर्ण व्हिडिओ सकाळी पोस्ट करेन, काय झाले ते तुम्ही पाहू शकता. आमच्याकडे रेकॉर्डिंगही आहे. मी ठीक आहे.