Elon Musk : ट्वीटर युजर्सना एलॉन मस्क यांचा मोठा धक्का!
१ एप्रिलपासून ब्लू टिक हटवण्यात येणार
Twitter Verified : एलॉन मस्क यांनी ट्वीटरवर मालकी हक्क मिळवल्यानंतर ते लागोपाठ चर्चेत येत आहेत. एलॉन मस्क यांनी एकापाठोपाठ अनेक निर्णय घेतले आहेत. दरम्यान ट्वीटरच्या ब्लूटिक व्हेरिफिकेशनसाठी पैसे मोजावे लागत असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच १ एप्रिलपासून ट्वीटरकडून नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत.
ब्लू टीकसाठी पेड सबस्क्रिप्शन घेतले नसेल तर ब्लू टिक १ एप्रिलपासून हटवण्यात येणार आहे. या नियमानुसार तुम्ही ब्लू टिक सबस्क्रिप्शन घेतलं नसेल आणि पुर्वीच तुमच्या अकाउंटला ब्लू टीक आहे अशा युजर्सनी प्रोपाऊल नाव किंवा फोटो बसलल्यास त्यांचं ब्लू टीक जाऊ शकते. यामध्ये पत्रकार, सेलिब्रीटी, राजकारणी ज्यांनी ब्लू टिकसाठी पैसे दिले नाहीत अशा सगळ्यांच्या अकाउंट्सची ब्लू टीक जाऊ शकते.
ट्वीटरचे सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर तुम्हाला अनेक सुविधा मिळतात. यामध्ये तुम्ही तुमच्या ट्वीटर अकाउंटचे ब्लू टिक सबस्क्रिप्शन घ्याल तेव्हा, ट्वीट एडिट करणे, जास्त मिनिटांचे व्हिडीओ अपलोड करता येणार आहेत. रिडर मोड आणि ब्लू टीक या सेवा तुम्हाला मिळणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केलं आहे. ब्लू टीक सबस्क्रिप्शनसाठी तुमचे अकाउंट हे ९० दिवस जुने असणे आणि व्हेरिफाईड फोन नंबर असणे आवश्यक आहे. तसेच ब्लू टीक सबस्क्रिप्शन असलेल्या अकाउंटवरील जाहराचींची संख्याही कमी असेल, असं मस्क यांनी स्पष्ट केलं आहे.