breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीराष्ट्रिय

Elon Musk : इलॉन मस्क यांची मायक्रोसॉफ्टवर दावा ठोकण्याची धमकी!

Elon Musk : जगभरात नेहमीच चर्चेत असणारे ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी मायक्रोसॉफ्टविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीने अवैधरित्या ट्विटर डेटाचा वापर केल्याचा आरोप एलॉन मस्क यांनी केल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

मायक्रोसॉफ्टच्या जाहिरात प्लॅटफॉर्मवरून ट्विटर हटवण्यात आल्यासंबंधीच्या एका ट्विटवर प्रतिक्रिया देताना मस्क यांनी हा इशारा दिला आहे. ‘त्यांनी अवैधरित्या ट्विटर डेटाचा वापर करून प्रशिक्षण दिले. कायदेशीर कारवाईची वेळ’ असं ट्विट करत मस्क यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्विटरने सुमारे दोन महिन्यांपूर्वीच घोषणा केली होती की त्यांच्या ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस युझर्सना दर महिन्याला किमान ४२ डॉलर शुल्क द्यावे लागेल. पण यानंतर मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपल्या प्रोग्रॅमिंगसाठी एपीआय शुल्क देण्यास नकार दिला होता.

मायक्रोसॉफ्ट कंपनीने माहीती दिली होती की, जाहिरातींसाठी त्यांचे सोशल मीडिया आणि शेड्युलिंग टूल आता ट्विटरला सपोर्ट करणार नाही. तसेच येत्या २५ एप्रिलपासून युझर्स ट्विट आणि ड्राफ्टसारखी कामे करू शकणार नाही. ते मागील ट्विट आणि अटॅचमेंटही बघू शकणार नसल्याचं म्हटलं होतं. मायक्रोसॉफ्टची ही स्मार्ट कंपन्सेशन सेवा जाहिरातदारांना फेसबूक, इन्स्टाग्राम आणि लिंक्डइनच्या सेवांवर सोशल मीडिया कॅम्पेन मॅनेज करायला मदत करते.

एलॉन मस्क यांनी मायक्रोसॉफ्टवर आरोप केला की, कंपनीने त्यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल चॅटजीपीटीला प्रशिक्षित करण्यासाठी ट्विटर डेटाचा अवैधरित्या वापर केला. मायक्रोसॉफ्ट ओपनएआयमधील मोठ्या गुंतवणुकदारांपैकी एक आहे. २०१८ मध्ये ते कंपनीपासून वेगळे झाले होते. दरम्यान ओपनएआय ही मस्क यांच्याकडून स्थापित एआय संशोधन प्रयोगशाळा आहे. एलॉन मस्क यांच्या आरोपांवर मायक्रोसॉफ्टकडून सध्या कसलीही प्रतिक्रिया आली नसल्याचं समजतंय.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button