अध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडी

शिक्षण, नोकरी आणि आरोग्य कसे असणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

सिंह आणि कन्या राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे

ज्योतिष शास्त्रानुसार, डिसेंबर (December) महिना लवकरच सुरु होणार आहे. वर्षाचा शेवटचा महिना असल्याने हा महिना फार खास असणार आहे. यासाठीच डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा सर्व राशींसाठी कसा असणार आहे. या आठवड्यात अनेक मोठ मोठ्या ग्रहांची हालचाल पाहायला मिळेल. त्यामुळे डिसेंबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सिंह आणि कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

सिंह रास साप्ताहिक राशीभविष्य (Leo Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) – तुमच्या प्रेमसंबंधांविषयी बोलायचं झाल्यास, नातेसंबंधात गोडवा निर्माण होईल. नवविवाहितांसाठी हा काळ अनुकूल आहे. सिंगल लोकांना लग्नाचे नवीन प्रस्ताव येऊ शकतात.

करिअर (Career) – कामात यश मिळेल. तुमच्या मेहनतीचं फळ नक्कीच मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. तसेच, तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. नोकरीत प्रमोशनही मिळण्याची शक्यता आहे.

आर्थिक स्थिती (Wealth) – नवीन आठवड्यात देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर हा काळ तुमच्यासाठी फार शुभकारक असणार आहे.

आरोग्य (Health) – शारीरिक ऊर्जेत वाढ दिसेल. व्यायाम सुरू ठेवणे फायदेशीर ठरेल. तसेच, नियमित आरोग्यासाठी पुरेशी झोपही तितकीच गरजेची आहे.

हेही वाचा   :   ज्ञानोबा माऊलीचे कार्य सातासमुद्रापार स्टॅण्डफोर्ड विद्यापीठात नेणार; मंत्री आशिष शेलार

कन्या रास साप्ताहिक राशीभविष्य (Virgo Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) – नात्यात भावनिक स्थैर्य येईल. काही जणांना साखरपुड्याचे योग निर्माण होतील. नवीन लोकांशी भेटीगाठी होतील. पार्टनरबरोबर छानशा ठिकाणी फिरायला जाल.

करिअर (Career) – नवीन आठवड्यात तुमच्यासाठी शिकण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील. स्वतःच्या कौशल्यांचा योग्य वापर करा. तसेच, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी सहकार्य ठेवा.

आर्थिक स्थिती (Wealth) – आर्थिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी चांगला काळ आहे. जुने पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. यासाठी पैशांची बचत करा.

आरोग्य (Health) – नवीन आठवड्यात तुमचं मन प्रसन्न राहील. मात्र, स्क्रीन टाईम कमी करा आणि झोपेचं वेळापत्रक पाळा. तसेच, नियमित आहार घेणं गरजेचं आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button