युक्रेनबरोबर वाटाघाटी करणे कठीण; रशियाची कबुली
![Difficult to negotiate with Ukraine; Russia's confession](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/war.png)
कीव -युक्रेन | रशिया युद्ध कधी संपेल या बाबत आम्ही काहीच सांगू शकत नाही कारण सध्या तरी युक्रेनची भूमिका पाहता त्यांच्या सोबत शांततेसाठी बोलणी करणे कठीण आहे; अशी स्पष्ट कबुली रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी दिली. त्यातच अमेरिकन संसदेत युक्रेनच्या राष्ट्रपतींना बोलण्याची संधी देण्यात आल्याने पुतीन अधिकच संतप्त झाले आहेत. त्यामुळे आज एकविसाव्या दिवशीही युद्ध सुरूच आहे, रशियाने कीव ताब्यात घेण्यासाठी सर्व ताकत पणाला लावली आहे. रशियाच्या लढाऊ विमानांनी आजही कीव शहरावर तुफानी हवाई हल्ले केले त्यात अनेक इमारती जमिदोस्त झाल्या.
रशियन फौजांनी दक्षिण युक्रेनच्या खेर्सोन शहरावर ताबा मिळवला आहे. मात्र या शहरात अडकलेल्या तीन भारतीयांना रशियन सैन्याने सुरक्षित बाहेर काढले. तर दुसरीकडे संपूर्ण कीव शहरावर ताबा मिळवण्यासाठी शहरात घुसण्याचा प्रयत्न करीत आहे. पण युक्रेन सैन्य आणि नागरिकांकडून होत असलेला कडवा विरोध पाहता कीववर ताबा मिळवणे रशियाला खूपच कठीण झाले आहे. त्याच बरोबर युक्रेनसह जी चौथ्या फेरीची चर्चा झाली तीही असफल ठरली. कारण युक्रेन जराही माघार घ्यायला तयार नाही. रशियाच्या तटस्थतेचा प्रस्ताव सुद्धा युक्रेनने फेटाळला आहे. जेलान्स्की यांचे जवळचे सहकारी पोडोल्यक यांनी सांगितले कि सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु आहे, अशा वेळी आम्हाला कायदेशीर सुरक्षेची पूर्ण शाश्वती मिळाल्याशिवाय आम्ही रशियाचा कोणताही प्रस्ताव स्वीकार नाही. त्याचबरोबर अमेरिकेने जीलेन्स्की यांना अमेरिकन संसदेत भाषण करण्यासाठी पाचारण करणे म्हणजे युक्रेनला उघड पाठिंबा देण्यासारखे आहे. आणि अशा परिस्थितीत युक्रेन् सोबत वाटाघाटी होऊच शकत नाहीत असेही राष्याच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले त्यामुळे हे युद्ध तूर्तास तरी संपेल असे वाटत नाही.