Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी
वाहनचालकांना मोठा दिलासा! ‘फास्टॅग’ केवायसी अपडेट करण्यासाठी मुदत वाढवली
![Deadline for updating FASTag KYC extended](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Fastag-KYC-Update-780x470.jpg)
Fastag KYC Update | ‘एनएचएआय’ने ‘फास्टॅग’संदर्भात वाहन चालकांना दिलासा दिला आहे. ज्यांनी अद्याप ‘फास्टॅग’चे ‘ई-केवायसी’ केले नाही त्यांना २९ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ज्या वाहनचालकांनी ई-केवायसी केले नसेल अशांचे ‘फास्टॅग’ ‘डिएक्टिवेट’ होईल. परिणामी त्यांना दुप्पट टोल द्यावा लागणार आहे.
असे करा अपडेट :
- प्रथम fastag.ihmcl.com या संकेतस्थळावर लॉगइन करा.
- नोंदणीकृत मोबाईल आणि पासवर्ड टाका.
- डॅशबोर्डवर ‘माय प्रोफाईल’वर क्लिक केल्यावर योग्य ती माहिती भरावी लागेल.
हेही वाचा – छत्रपती संभाजीराजे लवकरच झळकणार चित्रपटात, कोणती भूमिका साकारणार?
- त्यानंतर अपडेट झाले की नाही हे कळेल.
अपडेट करण्यासाठी लागणारी कागदपत्रे :
- वाहन नोंदणी प्रमाणपत्र
- फोटो
- वाहन परवाना, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड यापैकी कोणताही एक पुरावा.