#Covid-19: अमेरिकेमध्ये कोरोनामुळे 10 हजार Minkचा मृत्यू; मानवांकडून प्राण्यांमध्ये संक्रमण झाल्याची पुष्टी?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Mink.jpg)
नवी दिल्ली: चीनच्या वूहान शहरामधून सुरु झालेल्या कोरोना विषाणूने जगभरात हाहाकार माजवलेला आहे. एकीकडे सर्व देश या विषाणूशी सामना करत आहेत तर दुसरीकडे एक नवी समस्या उभी राहिली आहे. अमेरिकेच्या उटाह आणि विस्कॉन्सिन मध्ये तब्बल दहा हजार मिंक मरण पावलेले आहेत. मानवांकडून मिंकमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. उटाहमध्ये जवळजवळ 8 हजार व व्हिस्कोन्सिन मध्ये दोन हजार मिंकचा मृत्यू झालेला आहे.
मिंक हे आकाराने लहान असलेले प्राणी असतात ज्यांच्या शरीरावर रेशमी केस असतात. उटाहमध्ये पशुवैद्य डीन टेलर म्हणाले की, या दोन प्रांतातील प्राण्यांमध्ये कोरोना व्हायरसची पहिली घटना ऑगस्टमध्ये समोर आलेली होती. येथे जुलै महिन्यात पहिल्यांदाच फार्म वर्कर्सना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला व त्यानंतर तो प्राण्यांमध्येही पसरला होता. कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी नुकत्याच केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की, बर्याच प्राण्यांना कोरोना विषाणूचा धोका आहे. नॅशनल वेटरनरी सर्व्हिसेस लॅबने कुत्री, मांजरी, सिंह आणि वाघ यांसारख्या डझनभर इतर प्राण्यांमध्ये कोरोना विषाणूची नोंद केलेली आहे.