#CoronVirus |फेसबुकवरून अफवा; वकिलाविरुद्ध गुन्हा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/corona7-1.jpg)
नाशिक | करोनाबाबत रुग्णांची चुकीची आणि अधिकार नसताना फेसबूकवर टाकलेली पोस्ट एकास महागात पडली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, मागील २४ तासात या प्रकारे दोन गुन्हे शहर पोलिसांनी दाखल केले आहेत.
अॅड. अजिंक्य गिते असे या गुन्ह्यातील संशयित व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी अमीर आयूब शेख यांनी फिर्याद दिली. अफवा पसरवून नागरिकांची दिशाभूल केल्याच्या आरोपावरून हा गुन्हा दाखल झाला आहे. अॅड. अजिंक्य गिते यांच्या फेसबूकवर पाथर्डी फाटा भागात संशयित कोरोना रुग्ण सापडला, असा मजकूर व्हायरल करण्यात आला.
या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी चुकीचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केल्याचा आरोप ठेऊन हा गुन्हा दाखल केला आहे. मागील २४ तासातच शहर पोलिसांनी अफवा पसरविल्याप्रकरणी स्वतंत्र दोन गुन्हे दाखल केले आहेत.