breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास चंद्रपूर जिल्ह्यात २०० रुपये दंड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/H58c28bae650947c28afaed42cec9024fN.jpg_300x300.jpg)
करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासन वेळोवेळी सूचना व आदेश देत आहे. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचना व नियमांचे काटेकोर पालन करावे अन्यथा कारवाई करण्यात येईल. तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास २०० रुपये दंड ठोठावण्यात येईन असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिले आहे. नागरिकांनी महत्त्वपूर्ण बाबींचे पालन करण्याचे आदेश त्यांनी दिले आहे.