Breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र
#CoronaVirus |साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/CoronaVirus-1.png)
सातारा | साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. कॅलिफोर्नियावरुन आलेल्या 63 वर्षीय पुरुषाचा आज (6 एप्रिल) पहाटे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूंची संख्या 46 वर पोहोचला आहे. तर राज्यातील 748 जण कोरोनाबाधित आहे. साताऱ्यात आज मृत्यू झालेल्या रुग्णाला 14 दिवसांपूर्वी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. काल फेर तपासणीत या रुग्णाचे निगेटिव्ह आले होते. मात्र आज पहाटे या रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण साताऱ्यातील पहिला कोरोना बळी ठरला. जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी याबाबतची माहिती दिली.