Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus | राज्यात कोरोनाचा वाढता कहर, 24 तासात मुंबई-पुण्यात 10 नवे रुग्ण
![Corona's cry again across the country! 459 people lost their lives in 24 hours](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/corona-4th-death_202003390172.jpg)
मुंबई : देशात कोरोनाबाधितांचा आकडा 324 वर पोहोचला आहे. तर महाराष्ट्रात 24 तासात कोरोना रुग्णांचा आकडा 74 झाला आहे. महाराष्ट्रात एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात हा कोरोनाचा दुसरा बळी ठरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील कोरानाबाधितांची संख्या 74 झाली आहे. गेल्या 24 तासात राज्यात 10 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यात 6 मुंबईचे आणि 4 पुण्यातील रुग्ण आहेत. त्यामुळे मुंबई आणि पुण्यात कोरोनाचा वाढता कहर पाहायला मिळत आहे. दरम्यान मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा हा 25 वर पोहोचला आहे. तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 27 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.