Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
#CoronaVirus: रशियाची लस माकडांनाही देणार नाही, अमेरिकेने रशियाच्या लसीची उडवली खिल्ली

पुणे: कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागतो आहे. या आजारावर औषध शोधण्याचं, त्याची चाचणी करुन लवकरात लवकर ते औषध सामान्य माणसांसाठी उपलब्ध करवून देण्याचा प्रयत्न जगातील अनेक देश करत आहेत. भारतातही देखील त्यासाठी मोठे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, रशियाने कोरोनावरील लस सोधल्याचा दावा केलेला आहे. कोरोनामुळे जगात अनेक मोठे बदल पाहायला मिळत आहेत. अशातच अमेरिकेने मोठं वक्तव्य केलेलं आहे.
अमेरिकेने रशियाने शोधलेल्या लसीची थट्टा केली आहे. रशियाची लस ही माणसांना तर सोडा, अमेरिकेतल्या माकडांना सुद्धा देणार नाही, अशा शब्दात अमेरिकेनं रशियन लसीची खिल्ली उडवलेली आहे. ज्या वेगाने रशियाने लस विकसीत केलेली आहे. ते अतिशय गंभीर आहे. त्यामुळे रशियाच्या लसीला फार महत्त्व देण्याची गरज नसल्याचंही अमेरिकेने म्हटलेलं आहे.





