Breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: मालेगावात आत्तापर्यंत २५० कोरोना रुग्णांना डिस्चार्ज- आरोग्यमंत्री राजेश टोपे
मालेगावात आत्तापर्यंत २५० करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मालेगावातली परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर राज्यातील रुग्णांची संख्या २५ हजार ९२२ आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मालेगाव येथे दौरा केला आणि तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.