Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: भारतात ८३ टक्के कोरोनाग्रस्त ६० वर्षांखालील; आरोग्य मंत्रालयाची आकडेवारी

भारतात करोना विषाणूचा प्रभाव अद्याप कायम आहे. आजवर देशात करोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २९०२ वर पोहोचली असून ६८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, एकूण करोनाबाधितांमध्ये ८३ टक्के रुग्ण हे ६० वर्षांखालील असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीतून समोर आलं आहे.
यामध्ये देशात सर्वाधिक ४१ टक्के करोनाबाधित रुग्ण हे २१ ते ४० टक्के वयोगटातील आहेत. मात्र, ज्येष्ठांना या आजाराचा सर्वात जास्त धोका असल्याचे म्हटले जात असले तरी एकूण बाधित रुग्णांपैकी आत्तापर्यंत ६० वर्षांवरील केवळ १७ टक्के रुग्ण करोनाग्रस्त आढळून आले आहेत.





