Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: भारताची परिस्थिती आणखी बिकट; २४ तासांत कोरोनाचे ४९ हजार नवे रुग्ण
![The total number of corona infections in India is 1,11,92,088 with 18,327 new patients](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/el-coronavirus-no-esta-vivo-ni-muerto-4.jpg)
नवी दिल्ली: देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात कोरोनाचे ४९, ३१० नवे रुग्ण आढळून आलेले आहेत. तर ७४० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येतील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे भारत आता लवकरच दिवसाला ५० हजार रुग्ण सापडण्याचा टप्पा ओलांडू शकतोय. ही अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे.
आतापर्यंत भारतात कोरोना विषाणूचे १२,८७,९४५ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४,४०, १३५ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत ८,१७, २०९ जण कोरोनातून बरे झाले आहेत. मात्र, कोरोनामुळे देशातील ३०,६०१ लोकांचा मृत्यू झालेला आहे. कोरोनाच्या झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णांमुळे भारत देश अत्यंत बिकट परिस्थितीत सापडलेला आहे.