#CoronaVirus: पिझ्झा डिलिव्हरी बॉयला कोरोना विषाणूची लागण,72 कुटूंब होम क्वारंटाईन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Untitled-82.png)
दक्षिण दिल्लीतील मालवीय नगरमध्ये पिझ्झाची होम डिलिव्हरी करणाऱ्या एका व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर या भागातील ७२ कुटूंबियांना सध्या होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे…
दक्षिण दिल्लीचे जिल्हाधिकारी बी एम मिश्रा यांनी सांगितलं की , गेल्या महिन्याभरापासून ही व्यक्ती आजारी होती. त्याला खोकल्याचा त्रास होता. त्याने रुग्णालयात दाखवले सुद्धा होते. पण हा सामान्य खोकला असल्याचे सांगत त्याला घरी पाठवण्यात आले होते. पण महिना झाला तरी खोकला कमी होत नाही म्हणून या व्यक्तीला आरएमएल रुग्णालयात पाठवण्यात आले. तिथे चाचणी केल्यावर त्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.
११ एप्रिलला या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्या दिवशी त्याने एकूण ७२ ठिकाणी पिझ्झाची डिलिव्हरी केली होती. त्यामुळे या सर्व कुटूंबियांना सध्या होम क्वारंटाईन राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एकूण १७ तरूण या व्यक्तीसोबत थेट संपर्कात आल्याचे स्पष्ट झाले. या सर्वांना छत्तरपूरमध्ये अलगीकरण कक्षामध्ये हलविण्यात आले आहे. केवळ खबरदारीचा उपाय म्हणून हे करण्यात आले आहे.