breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus | पंढरपुरातील चैत्र वारी सोहळा रद्द
मुंबई | महाराष्ट्राचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभव असलेला पंढरपुरातील (Pandharpur) चैत्र वारी सोहळात कोरोनाचे विघ्न आल्याने यंदा वारी सोहळा रद्द करण्यात आला आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. कोरोनाच्या ) पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व उत्सव, सोहळे रद्द करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पंढरपूरचा वारी सोहळा हे महाराष्ट्राचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभव आहे. वारकऱ्याच्या आणि भक्त भागवताच्या अंत:करणात विठ्ठलभक्तीचे हे सूक्ष्म बीज वारीच्यानिमित्ताने रुजते आणि विठ्ठलाच्या दर्शनाने त्याला बहर येतो. परिणामी आज चैत्र वारी सोहळा रद्द करण्यात आला आहे. वारकरी संप्रदायातील महत्त्वाची मानली जाणारी चैत्र वारी अखेर रद्द करण्यात आली आहे. 4 एप्रिल रोजी या वारीचा मुख्य दिवस म्हणजेच चैत्र एकादशी आहे.