breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus | नाशिकवरून ८३९ लोकांना घेऊन ट्रेन उत्तर प्रदेशला रवाना
![Konkan Railway closed due to floods](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/train-2.jpg)
नाशिक | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरू आहे. अनेक मजूर, श्रमिक देशात अनेक ठिकाणी अडकले होते. त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी विशेष ट्रेन रवाना करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातूनही लखनऊसाठी आज (३ मे) नाशिक रेल्वे स्टेशनवरून उत्तर प्रदेशच्या लखनऊसाठी ८३९ लोकांना घेऊन ही ट्रेन रवाना झाली आहे.
दरम्यान, लॉकडाऊनमुळे देशभरात विविध राज्यात अडकलेले प्रवासी, कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी व इतर लोक लवकरच स्वगृही परतणार आहेत. या सर्वांना आपापल्या घरी पोहचवण्यासाठी कामगार दिनापासून “श्रमिक विशेष” रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. त्यासाठी गृहमंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.