Breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus |नाशिकमध्ये कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा ५७२

नाशिक | जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ही ५७२ पर्यंत पोहोचली आहे. यामध्ये ४५ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले असून १९ रूग्णांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात नाशिक विरूद्ध मालेगाव असं चित्र उभं राहिलं आहे. नाशिक महापालिकेत ४४ रूग्ण आढळले आहेत. नाशिकमध्ये चांदवड, सिन्नर, दिंडोरी, निफाड, नांदगाव, येवला, सटाणा, मालेगाव ग्रामीण असे एकूण ६१ रूग्ण आढळले आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये ६१ रूग्ण आढळले असून नाशिक तालुक्यात ८, चांदवड ३, सिन्नर ५, दिंडोरी १, निफाड ५, नांदगाव २, येवला २५, सटाणा १, मालेगाव ग्रामीण ११ कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. तर मालेगाव महापालिकेत एकूण ४४८ कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत.




