Breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus | नागपुरात भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Nagpur.jpg)
नागपूर | राज्याच्या उपराजधानीत कोरोनाचा फैलाव वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, कोरोनाचे गांर्भीयच लोकाना नसल्याचे दिसून येत आहे. भगवाननगर येथील मैदानावर सुरू कऱण्यात आलेल्या भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असलेल्या नियमावलीचं या भाजीबाजारात पालन होत नसल्याचं चित्र समोर आले आहे. भाजीबाजार भरत असलेल्या मैदानाला लागूनच वस्ती असताना इथे बाजारपेठसाठी प्रशासनाने परवानगी दिली कशी, असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे. वस्तीला लागूनच सुरू करण्यात आलेल्या भाजीबाजारामुळे स्थानिकांचा विरोध आहे. मैदानाबाहेरही अनेक भाजी विक्रेते रस्त्यावर बसत असल्याने तिथेही भाजी खरेदीसाठी गर्दी करत आहे.