ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मध्यरात्री चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीत भीषण आग

दुकानाच्या इलेक्ट्रीक वायरिंग आणि सामनाला सुरुवातीला आग या आगीचा भडका उडाला यामध्ये सात जणांचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील सिद्धार्थ कॉलनीमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव पाहायला मिळाला. मुंबईतील चेंबूरमध्ये लागलेल्या आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आग लागल्याच्या घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले असता आग विझवण्यात त्यांना यश आले आहे.

चेंबूर परिसरात असलेल्या सिद्धार्थ कॉलनीतील दुमजली घराला आग लागली. सध्या या ठिकाणी कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. मुंबई महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीमध्ये असलेल्या चाळीतील एका दुमजली घराला पहाटे सव्वा पाच वाजेच्या दरम्यान आग लागली. घराच्या तळमजल्यावर एक दुकान होते. या दुकानाच्या इलेक्ट्रीक वायरिंग आणि सामनाला सुरुवातीला आग लागली आणि या आगीचा भडका उडाला यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला. या आगीमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पॅरिस गुप्ता (7), मंजू प्रेम गुप्ता (30), अनिता प्रेम गुप्ता (39), प्रेम गुप्ता (30), नरेंद्र गुप्ता (10), विधी गुप्ता (15), गितादेवी गुप्ता (60) अशी मृत व्यक्तींचे नावे आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button