Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: धक्कादायक! फक्त तीन दिवसांत देशात सापडले दीड लाख रुग्ण, 24 तासांतील आकडेवारी चिंताजनक

नवी दिल्ली: जगभरात व देशात कोरोनानं थैमान घातले आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 48 हजार 661 नवीन रुग्ण सापडले, तर 705 जणांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संखअया 13 लाख 85 हजार 522 झाली आहे. यातील 4 लाख 67 हजार 882 रुग्ण सक्रीय आहेत. तर, 8 लाख 85 हजार 577 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. 32 हजार 063 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारताचा रिकव्हरी रेट 63.9% झाला आहे.

मुख्य म्हणजे शनिवारी देशात सर्वात जास्त कोरोना चाचणी करण्यात आल्या आहेत. एकाच दिवसात 4.42 लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत. यासह देशात एकूण 1 कोटी 63 लाख लोकांची चाचणी करण्यात आलेली आहे. गेल्या 30 दिवसात सगळ्यात जास्त कोरोना चाचण्या करण्यात आल्या. तर, जगभरातील एकूण कोरोना रुग्णांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button